माझा भारत
माझा भारत
1 min
359
माझा भारत
स्वच्छ सुंदर
निसर्ग सौंदर्य
येतसे बहर...
माझा भारत
जगात प्रिय
आम्ही सारे
एक भारतीय...
देशप्रेमासाठी
देतात जान
भारत माझा
जीव की प्राण...
आधुनिक साधने
प्रगत हो राष्ट्र
सुसज्ज असे
आमचे राष्ट्र...
विविधतेत एकता
सुखाने नांदती
भारताचे सौख्य
नदी नाल्या सांगती...
माझा भारत
सुजलाम सुफलाम
कष्टाने जगती लोकं
नाही कसला आराम...
स्नेहभाव जपती
परंपरा छान
मराठीचा मज
असे अभिमान...
राष्ट्रभाषा हिंदी
असे तिला मान
भारत माझा
आहे माझी जान...
