माझा भारत
माझा भारत
1 min
140
माझा भारत देश
मी भारत देशाचा
अभिमान मज वाटतो
मी भारताचा....
विविधतेत एकता
ते सुखाने नांदते
विविधतेत एकोपा
अंगणी खेळते....
पंथ,भाषा,धर्म अनेक
तरी राहते एक दिलाने
नानाविध इथे लोक
जगती आनंदाने....
हिमालयाचा साज
प्रिय माझा भारत
डौलाने फडकतो
तिरंगा सतत....
भीती न आम्हा कशाची
वाटे मज अभिमान
मी भारत देशाचा
राखतो मी मान.....
