माझा भारत
माझा भारत
1 min
117
माझा भारत
लाखात आहे देखना
मनास भावना
पहा....
भारत महान
प्रिय अमुचा देश
भिन्न वेश
असे....
विविधतेत एकता
असते आमच्या मनी
सुखाचा धनी
भारत.....
भिन्न भाषा
आम्ही सारे भाऊ
सारे राहू
एकदिलाने....
प्राणाहूनही प्रिय
असा आमचा भारत
जगात डौलत
अभिमानाने.....
