माहेरची आठवण
माहेरची आठवण

1 min

701
माहेराची आठवण,
माये तुझीच गं खूण.
इथे तिथे भरलेले-
माझे सारे बालपण
माहेराची आठवण,
डोळां आसवांची खाण.
तूच नाही आता तिथे,
काय सांगू रितेपण !
माय जाताच माहेरी,
माझे माहेर संपते,
साऱ्या जगाची माऊली
विठाबाई आठवते.
माहितही नाही ज्यांना,
माय, माहेर कोणते,
अशा लेकीबाळींसाठी
मीच माहेर बनते.