मागणार नाही तुला मी
मागणार नाही तुला मी
घेतली आहेच तू तर शप्पत मला मारण्याची
मोकळीक देतो तुला मी तमा नको हारण्याची
उभा असतोच मी गर्दीत तुझ्या विरहाच्या
दोष तुला देत नाही भीती मला टाळण्याची
गुलाब साठवून ठेवले आहेत मी तुला दिलेले
तू फेकले असे की वेळ आली सांभाळण्याची
मागणार नाही तुला मी देवाकडे पुन्हा आता
कारण सीमा ओलांडली मी तुला मागण्याची
हक्क तुझे तुला मी सारे बहाल केले होते
बघ वेळ आली ही माझेच दुःख हाताळण्याची
खचलो आहे असा की उभा राहणार नाही
पुन्हा कृपा करू नको माझ्यावर भाळण्याची
घे श्वास मोकळा तू मी तयार आहे मरणाला
मग करशील तयारी आता मला जाळण्याची
