लोकशाही
लोकशाही
1 min
185
काल पाहीला मी,खेळ पैशाचा
केला याने चुराडा लोकशाहीचा,
दारू,मटण खाऊन सारे कसे झुलत होते,
मतदान कुनाला करावे याना काहीच कळत नव्हते,
हा सारा खेळ होता पैशाचा म्हणूनच
काल चुराडा झाला बघा लोकशाहीचा..!
नको नको ते स्वप्न यांना दाखविले
खुर्ची-साठी नको नको ते यांनी केले
नव-युवकांच्या हाती दारूची बोटल
देवून त्यांचे आयुष्य ही बरबाद केले
हा सारा माज होता पैशाचा म्हणूनच
काल चुराडा झाला लोकशाहीचा..!!
वाटले होते मजला मतदान आहे
गावचे हित साधण्या साठीच हे
योगदान आहे,पण उधळण झाली
काळ्या कमाईतून कमवलेल्या
साऱ्या पैशाची म्हणूनच
काल चुराडा झाला लोकशाहीचा.!!!
