अस काय तिच चुकल
अस काय तिच चुकल
रूढी-परंपरा मोडून तिन वागल
नको नकोते स्वप्न तिन पाहील
इथच तर तिच सर्व काही चुकल
म्हणूनच की काय त्यांन तिला कापल!
प्रेम आंधळे असते तिन दाखवून दिल
जात-पात विसरून,त्याला स्विकारल
तोडून नाती गोती सारी,वागत होती न्यारी,
इथच तर तिच सर्व काही चुकल,
म्हणूनच की काय त्यांन तिल कापल!!
तोडले ह्रदय आई-वडीलांचे तिने
तोडले बंधन सारे समाजाचे तिने
एक माणूस मिळवण्यासाठी तिने
तोडले होते नाते रक्ताचे सारे
इथच तर तिच सर्व काही चुकल होत,
म्हणूनच की काय त्यांन तिला कापल होत..!!!
आत्ता कोणी म्हणे तो मुस्लिम आहे
कोणी म्हणे तो पारडी आहे विसरली होती
ओळखण्यास त्यांला ती..
इथच तर तिच सर्व काही चुकल होत.
म्हणूनच त्यांन तिला कापल होत.!!!
त्याला तुम्ही तरी आत्ताओळखा रे
तो तर माणूस रूपी राक्षस आहे रे....
