मज काही उमजत नाही...
मज काही उमजत नाही...
1 min
305
मज काही उमजत नाही....
काय करावे काही समजत नाही
दुःख आयुष्यातले मिटत नाही
सोशितो वेदना कुणासाठी मी
हे मज काही उमजत नाही..!
कुणासाठी जगावे. कुणासाठी मरावे.
भाव मनातले मनातच ठेवावे की कोणासमोर माडांवे
उमजत नाही काही कोणास
आपले समजावे...!!
भटकंती आयुष्याची संपत नाही
सुखाची चाहूल मज लागत नाही
राब राबोनी दमलो आत्ता
विचार करूनी थकलो आत्ता
जगण्याची उमीद मज राहीली नाही...
काय करावे काही कळत नाही
जगावे की आत्ता मरावे
मज काही उमजत नाही...!
