...फक्त तू लढ म्हण...
...फक्त तू लढ म्हण...
1 min
808
....फक्त तू लढ म्हण....
पुन्हा नव्याने पेटून उठेन मी
अन्ययावरती तुटून पडेन मी
हे युद्ध पुन्हा जिकेन मी
फक्त तू लढ म्हण...!
आले कितीही संकटे तरी
त्यावरती मात करेन मी
न थाबता,न थकता कधी
ही वाट चालेन मी
फक्त तू लढ म्हण.!!
कर्णा सारखा त्याग करेन मी
अर्जुना सारखे कर्म करेन मी
स्वराज्याचा मावळा मी
दिलेला शब्द पाळणार मी
फक्त तू लढ म्हण..!!!
शिवरायांची घेवून आन
तुझ्यासाठी आहोरात्र लढणार मी
गर्वाने भगवा ध्वज फडकविन मी
हे मराठी माणसा
फक्त तू लढ म्हण..!!!!
