STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

लेक वाचवा

लेक वाचवा

1 min
472

लेक वाचवा शिकवा

लेक घराचा आधार

लेक वंशाची पणती

करी स्वप्न साकार.......!!


लेक लावते हो माया

लेक घराची हो शान

घरासाठी तळमळे

लेक घराचा सन्मान....!!


माता-पित्याचाच अंश

तिला येऊ द्या जन्माला

कसे कळणार तुम्हां

मोल रे कन्यादानाला......!!


लेक घराची काळजी

लेक पवित्र तुळस

लेक सुखाचं पाखरू

लेक घराचा कळस........


लेक नात्यांची रे वीन

नानाविध रूपे तिची

आई, बहिण, मुलगी

सासू, आत्या व भाची....!!


खाण नर रत्नाची ती

लेक सुंदर परिस

मुली मारता गर्भात

तीच तुमचा वारस....!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन