STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Others

3  

Sanjay Dhangawhal

Others

लेक सासरी जाताना

लेक सासरी जाताना

1 min
390

लेक सासरी जाते तेव्हा

बापाला वाटतं 

माझे काळीज 

माझ्यापासून दुर गेले

माझ्या देहातले 

एक घर रिकामे झाले


लेक सासरी गेल्यावर 

आईचे मनही हळवे होत असते

शोकेसमधली खेळणी पाहून 

 लेकीच्या आठवणीत दिसते


लेक सासरी जाताना 

हसरा चेहरा आईचा 

कधी रडका कधी भावनिक दिसतो

तेंव्हा मात्र 

बापाच्या डोळ्यात 

अश्रुंचा पाऊस असतो

 

आईबाबांचा हात सोडून

लेक तिच्या घरी जाते तेव्हा....

आई चारचौघात रडून घेत असते 

बापाला रडायला मात्र

एकांताशिवाय दुसरी जागाच नसते 


लेक सासरी असताना माहेराचे

आंगण लेकीवाचून सुने सुने होते

ती गेल्यावर तिच्यामुळे

सासरचे घर शेभून दिसते 


लेकीने मोठ होवू नये

घर सोडून तिने जावू नये

अस प्रत्येक आईबाबांना वाटत असते

पण नाही...

 ती माहेरा ची लेक आणि

सासरची सून असते

म्हणून तिला जावचं लागतं..


Rate this content
Log in