*लेक माझी लाडकी**************
*लेक माझी लाडकी**************
1 min
623
लेक माझी लाडकी
परी ती दिसते
काळजात शिरूर
मन माझ वाचते
दारात उभी राहून
वाट माझी पहाते
तिच्यामध्ये मला
माझी माय दिसते
दमून येतो घरी तेंव्हा
ती बिलगून जाते
न बोलताही तिला
माझी भुकं कळते
हात पाठीवर ठेवून ती
बळ जगण्याच देते
सावली होवून ती
काळजी माझी घेते
लेक माझी लाडकी
कधी हट्ट करतं नाही
डोळ्यात माझ्या ती
अश्रु येवू देत नाही
कष्ट माझे मोलाचे
ती पहात असते
तिचा फाटका फराक ती
ठिगळ लावून घालते
एक दिवस परी माझी
सासरी जाणार
लेकीवाचून घर रिकामे होणार
मन माझे कोण वाचणार
