STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Others

4  

Sanjay Dhangawhal

Others

लेक माझी लाडकी

लेक माझी लाडकी

1 min
174

आई जाते मी

येते म्हणायला लावू नकोस

माझ्या चिंतेत राहू नकोस

मी परत येईलच गं

मला माहीत आहे...

मी बाहेर गेल्यावर

माझी लाडकी बाहुली

हातात घेऊन तू

दारात उभी राहतेस

दिवसभर माझी काळजी करतेस

तुझ्या जिवाची घालमेल

कोणालाच बघवत नाही

मी घरात आल्याशिवाय तू उंबरठा सोडत नाही


खरं आहे ना!

मी तुझी लाडकी मुलगी आहे

म्हणून तुला भीती वाटते

मी घराबाहेर जाताना डोळेभरून पाहाते

पण तुला सांगू का

ज्यांच्या मुली घरी परत आल्याच नाही त्यांच्या आईचं काय?

त्या आजही बाहुली घेऊन दारात उभ्या आहेत

आपली लाडकी घरी परत येण्याची वाट पाहात आहेत


तुला सांगू का 

कितीही मान खाली घालून निघाले ना तरी

त्याची नजर अंगभर फिरत असते

कितीतरी अपशब्द 

कानावर घेत असते

छेडायला तर ते 

चौका चौकात उभे असतात

बस पाहून पाहून

आधी डोळ्यांना तृप्त करून घेतात


मार्ग कितीही बदलला तरी नजर बदलत नाही

दुसऱ्या कुणावर रोखलेल्या नजरेला

त्यांना त्यांच्या लेकी बहिणी दिसत नाही

माणूस चांगला की वाईट काही कळत नसते

कोणाचीही नजर 

शरमेने झुकत नाही

ते एकसारखं टक लावून पाहतात

आणि त्यांच्या मातेच्या

गर्भाचा उद्धार करत असतात


या जगात तर स्त्रीनेच फक्त स्वतःला जपायचं

जीव मुठीत घेवून जगायचं

तिच्या वाटेला तर पावलागणिक अत्याचाराचा घडा असतो

बंधने गुलामीच्या पिंजऱ्यात बंदीस्त दिसतो

म्हणून तर तिला भीती घेऊनच जगायचे असते

आणि एक दिवस कधीतरी माणसांच्या गर्दीत

जळून मरायचे असते


Rate this content
Log in