कुटुंब
कुटुंब


पडक्या चार भिंतीमध्ये
होता तेव्हा विश्वासाचा झरा
प्रेमाने साधंलेेेल्या नात्यांना
होता तेव्हा अर्थ खरा
कौलारू अन कळकटलेली
घरे होती तेव्हा छोटेखानी
किती ही येवो कडवटपणा
होती प्रत्येकाची मधूरवाणी
नव्हता राग ना द्वेेेष कुणाचा
होती उत्साही सर्वांची मने
सर्वांसाठी राबत होती
तेव्हा सारी निःस्वार्थी तने
सदैैव होती कवाडे उघडी
अन् अतिथी होता तेव्हा देेव
माया ममतेचा कधीही राहीला
नव्हता रिकामा पेव
कुटुंबात ही भरला होता
तेव्हा ठासूून जिंवतपणा
उरल्या आठवणींमध्ये आता
भासतो फक्त निर्जीवपणा
काळ मागे सरला आता
अन् नाती झाली जुुुनी
भरलेल्या संसारावर असा
नांगर फिरवला कुुुणी