करोना आला म्हणून
करोना आला म्हणून
करोना आला म्हणून
माणूस माणसाला कळू लागला
मीपणा मिरवणाऱ्या माणसाला
आता देव आठवू लागला
देव देवळात बंद झालीत तेव्हा
देव न पुजणारी माणस
देवाच्या धावा करताय
माणूसकी नसलेली माणस
स्वतःमध्ये माणूसकी शोधताय
जातीपातीचे ध्वज मिरवणारेही
आता घरातच बंद झालेत
भेदभाव रंगरूप आणि धर्म विसरून
एकमेकांचे अश्रू पुसायला लागलेत
माणूस कसाही असुदेत
श्रीमंत गरीब
कधीतरी कुठेतरी केंव्हातरी
त्याला एकदिवस थांबावे लागते
आपल्याच अहंकारात जगणाऱ्याला
झुकावे लागते
माझं कोणीच काही करू शकत नाही
म्हणणाऱ्यांना स्वतःचा जीव आता खुप महत्वाचा वाटतोय
त्या सुक्ष्म करोना पासून
किती सुरक्षीत ठेवतोय
हा नियतीचा खेळ बघाना
त्या एका विषाणूमुळे सारे जग हैराण झाले
पळणारे पाय जागीच थांबले
भुक सुध्दा आता शांत झाली आहे
भाकर म्हणे विलीनीकरणात गेली आहे
वेळ केव्हा कशी येईल सांगता येत नसते
संकटसमयी लपायलाही जागा नसते
तेव्हा शेजारी कोण कोणत्याही पंथाचा असुदे
राग रूसवा विसरून
एकमेकांना आधार द्यायचा आहे
आपणच आपला देश जगवायचा आहे
खरतर या धरतीवर प्रत्येकजण हा तात्पुरता असतो
कितीही मिरवला जाती धर्माचा झेंडा
तो एक दिवस खाली उतरत असतो
म्हणून घाबरायचे नाही
आता लढायचे आहे
या भारतात आले किती
गेले किती असे लाख विषाणू
देश कधी हरला नाही
लढता लढता शहीद कधी झाला नाही
