STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

करंजी

करंजी

1 min
578

1)

आत भरता सारण 

टम्म टम्म गं फुगली 

बघा करंजी रूसली

कोप-यात गं बसली....!!

2)

फोड आले अंगावर 

दात दाखवते शुभ्र 

हळू घालता तोंडात 

छान लागते खोबरं.....!!

3)

तूप लावून लाट्याच्या 

छान लागते करंजी 

सूपभर करतात 

काकू आई आणि आजी...

4)

जर नसली करंजी 

ताट सुनेसुने वाटे 

दिवाळीच्या फराळात 

मौज तिला फार वाटे.....!!

5)

आवडती सर्वानाच 

गोड गोड गं करंजी 

वेळ लागे करावया 

करतेच पण आजी....!!

6)

शोभा तीही वाढवते 

ताट दिसते हो छान 

दिवाळीच्या फराळात 

आहे करंजीला मान.....!!

7)

सार करंजीचा सांगे

राग सारा गिळायचा

गोष्टी आतच ठेवून 

मन रे सांभाळायचा....!!

8)

किती बसले चटके 

एक सदा रहायचं 

खुश राहावे सदैव 

सार हेच शिकायचं...!!


Rate this content
Log in