कर्माची फळे
कर्माची फळे
लाटूनी माझा पैसा
ते खूप आनंदित जाहले,
त्रास देऊनी मजला
जणू त्यांना स्वर्गसुखच मिळाले
फसवणूक त्यांची पचली
म्हणून ते कुमार्गावर निघाले,
बुडवून माझा पैसा
ते स्वतःच बुडाले
कर्तृत्त्व त्यांचे शून्य परंतु
ऐशआराम त्यांना होता हवा,
पाहूनी दुसर्याचे सुख त्यांना
वाटत असे नेहमी हेवा
दुसर्यांची प्रगती पाहून ते
नेहमी जळू लागले,
बुडवून माझा पैसा
ते स्वतःच बुडाले
एक चोरी पचली म्हणून ते
करू लागले दुसरी चोरी,
करता करता वाहवत गेले अन्
विसरून गेले माणुसकीच सारी
पाहूनी त्यांची दुष्कृत्ये
त्यांचे अपत्यही त्याच मार्गावर निघाले,
बुडवून माझा पैसा
ते स्वतःच बुडाले
काळामागून काळ उलटला
फसवणुकीची लागली त्यांना सवय,
हव्यास लागला पैशाचा
अन् उरले नाही परिणामाचे भय
विश्वासघात करूनी ते
नात्यांनाही काळीमा फासू लागले,
बुडवून माझा पैसा
ते स्वतःच बुडाले
आता मात्र हद्दच झाली
अहंकार त्यांचा वाढत गेला
पैशापायी कित्येकांचा
संसार त्यांनी उद्ध्वस्त केला
लाटत होते पैसा परंतु
तळतळाटही घेत राहिले,
बुडवून माझा पैसा
ते स्वतःच बुडाले
एकेदिवशी घडले असे की
झाला त्यांना मोठा अपघात,
साथ देण्या न उरले कोणी
पुढे न आला मदतीचा हात
संपून गेले ऐश्वर्य सारे
क्षणात जमीनीवर आले,
बुडवून माझा पैसा
ते स्वतःच बुडाले
