कोरोना
कोरोना
आलाय म्हणे कोरोना
एक नविन आजार
चीनमध्ये धुमाकूळ
सारे लोकं बेजार....!!
पसरू नये भारतात
घ्या लोकंहो खबरदारी
फक्त खा शाकाहारी
हीच आपुली जिम्मेदारी...!!
हात धुवा साबणाने
काही तोंडात घालताना
धुवून पुसून घ्या भाज्या
रोज भाजी करताना......!!
किडे मुंग्या खातात
कोरोनाचे रूग्ण
कसे काय आले बघा
जिवनात हे विघ्न.....!!
निसर्गाचे चक्र फिरले
खूप सोसले निसर्गाने
माणसांची मनमानी
जीव घेतला कोरोनाने....!!
निसर्गाच्या विरुद्ध
नको जाऊ माणसां
मृत्यूची पहाट येईल
रोज भरदिवसा.......!!
रहायचे असेल सुखाने
निसर्गाचे जतन कर
निसर्गाच्या संवर्धनाने
सुख सारे ओटीत भर....!!
