STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

कोरोना व्हायरस

कोरोना व्हायरस

1 min
208

कोरोना व्हायरसला

जनहो घाबरू नका

स्वच्छतेचे नियम

सा-यांनीच ऐका....!!


फळं आणि भाज्या

घ्या तुम्ही धुवून

डेटॉलनी हात 

स्वच्छ घ्या धुवून....!!


उघड्यावरचे तर

मुळीच खाऊ नका

चिकन,मटन,अंडी

खाण्यात धोका....!!


नेहमी नेहमी हात

स्वच्छ धुवत रहा

आरोग्याला जपण्या तोंडाला 

रूमाल बांधून पहा....!!


नका लावू हात

नाक, तोंड, डोळ्याला

नोटा मोजताना 

थुंका नका लावू हाताला...!!


चांगल्या भाज्या खाऊन

बाहेर जाणा टाळा

तरच बसेल अशा

कोरोनाला आळा.....!!


Rate this content
Log in