कोणी येतं प्रपोज करतं
कोणी येतं प्रपोज करतं
1 min
12.2K
प्रपोज केला कोणी
दोष कोणावर आला
जो म्हणाला आपला
आता तोच परका झाला
प्रेम करणं अवघड झालं
प्रेमाच्या घाट वळणावर
कुणी येतं प्रपोज करत
अन कोण नेतं सरणावर
उगाच का त्रास व्हावा
आपलं आपलं म्हणतांना
काळजावर घाव होतो
डोळ्यात असावे भरतांना
शब्द शब्द वेचले जातात
काव्यरुपी या पुस्तकावर
कोणी येतं नशीब लिहून जातं
चुकून कोणत्या मस्तकावर
शेवट प्रेमाचा असा होतो
कधीचं कोणाला कळला नाही
आत्ता पर्यंत हेच खरं झालं
प्रेमात कोणता प्रेमी जळला नाही
