कोकणच्या मातीत
कोकणच्या मातीत
1 min
235
माझ्या कोकणच्या मातीत
हिऱ्या मोत्याची गं रास
सुपारी नारळ टणक
घमघमतो आंब्याचा सुवास
माझ्या कोकणच्या मातीत
फळबागाची झाली लागवड
करवंदाचं करुन कुंपण
दिमाखात उभे काजुचे झाड
माझ्या कोकणच्या मातीत
मधाळ फणसाचा गर
जांभुळ पिकलं टपोरं
नाही त्याला कशाची सर
माझ्या कोकणच्या मातीत
नाही मनामध्ये अढी
सगळीकडे एकच नाव
कोकणची प्रसिद्ध सोलकढी
माझ्या कोकणच्या मातीत
तांदूळ मायेने पिकतो
जगामध्ये उंचावून मान
कोकणचा राजा विकतो
