कोकण
कोकण
1 min
8.0K
कोकण माझा शोभे
शालू हिरवा महाराष्ट्राचा
हापूस आंबा येथला
शोभे राजा फळांचा
कोकण माझी बाग
काजू फणस नारळाची
हृदयात गोडवा असणार्या
साध्या सरळ माणसांची
कोकण माझी भूमी
निधडया छातीच्या वीरांची
देशासाठी प्राण देणार्या
महान त्या देशभक्तांची
कोकण माझा देखावा
दर्या खोर्या नद्यांचा
डोंगर कपारीतून जाणार्या
वळ्णा वळणांच्या वाटांचा
