STORYMIRROR

Durga Deshmukh

Others

3  

Durga Deshmukh

Others

कोकण माझ छान

कोकण माझ छान

1 min
224

राजधानी धरुन सात जिल्हे 

सिंधुदुर्ग, जंजिरा, रायगड किल्ले 

चहुबाजुला सागर पसरला छान 

कोकण माझ छान गाऊ त्याचे गुणगान 


नद्या खोरे उठुन दिसती पर्वत रांगा 

गाळ जमीनी आढळतो खडक जांभा 

चिपळूणच्या माथ्यावर बसले परशुराम 

कोकण माझ छान गाऊ त्याचे गुणगान 


कुठे सह्याद्रीच्या रांगा किनारी मिठागरे 

ज्वालामुखी उद्रेकाने गरमपाण्याचे झरे

 मुंबई घारापूरी ऐतिहासिक ठेवा महान 

कोकण माझ छान गाऊ त्याच गुणगान 


नटलेला कोकण खनिजाची खाण 

औषधी वनस्पतीने हरवुन गेले भान 

निसर्ग सौंदर्याने वाढली आमची शान

कोकण माझ छान गाऊ त्याच गुणगान


परशुराम माता कुंकणा पडले नाव 

खनिज सम काचेच्या वाळुला भाव 

ऐतिहासिक वारसा जपू ठेवुन भान 

कोकण माझ छान गाऊ त्याच गुणगान 


Rate this content
Log in