STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

4  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

कोजागिरी पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमा

1 min
981

Date: 12 Oct 2019

कोजागिरी पौर्णिमा 

अश्विन महिन्यातली पोर्णिमा 

सणांचा महिमा 

कोजागिरी


शरद ॠतूचे 

पडती टपोरे चांदणे 

सुखाचे मागणे 

करतो


आटविती दूध

काजू, बदाम, जायफळ 

पोरबाळांची धावपळ

दूधासाठी


आजच्या दिवशी

चंद्र येतो पृथ्वीजवळ 

मैत्रीची गंगाजळ

जणू


दमा रोग्याला 

चंद्राचा प्रकाश छान

कोजागिरीचा मान

पाळती


ऐक मानवा 

मन ठेव शुद्ध 

उघडेल प्रारब्ध 

चांगले


मिनुचे सांगणे 

अंतःकरणात शुद्ध भाव

चंद्रशितलेचा आव 

पडलेला


मन प्रसन्न 

मन आनंदी होईल 

चांदणे पडेल 

कोजागिरी


आजच्या दिनाला 

म्हणे शरद पोर्णिमा 

माडी पोर्णिमा 

कुणी


Rate this content
Log in