कन्यादान
कन्यादान
1 min
268
सहजीवनाची वाट
होते सुकर चांगली
लग्नगाठ बसताना
मना आतुरता आली
आली सोडून माहेर
जाण्या सासरी लाडकी
माहेरच्या घरातली
दाखवण्या माणुसकी
झाला मंत्रोच्चार छान
वरमाला गळ्यामध्ये
नजरानजर झाली
स्नेह दिसे डोळ्यामध्ये
विधी विधानांची नांदी
लग्नगाठ बांधलेली
सुकुमार सकवार
वधुकन्या लाजलेली
गोड स्वप्नांचा इमला
साकारण्या सुरु झाला
गोड जीवनात आता
मोद आपसूक आला
कन्यादान केले आता
लेक निघाली सासरी
बाप ह्दय रडले
शिरशिरी अंगावरी
