STORYMIRROR

Amol Shinde

Others

3  

Amol Shinde

Others

कण कण आसवांना

कण कण आसवांना

1 min
11.5K

किती दिवस झाले

आभाळ रडून थकले

मनाला कळलं नाही

कोण होतें कुठे चुकले


कण कण आसवांना

किती समजावले होते

तुझ्या प्रत्येक भेटीला

आनंदाने कवटाळले होते


बहाल करणार होतो

तुझ्या असण्याचे श्वास

असे हक्क कुणाला

दिले नव्हते मी खास


घोट घोट हा जिंदगीचा 

संपून चालला होता

अंदाज का या आरशाने 

तू असण्याचा बंधला होता


काडी काडी गोळा होऊन

स्वप्नांचा महाल सजला होता

विरहाच्या दुनियेत येणारा

प्रत्येक शब्द येथे झिजला होता


Rate this content
Log in