खरंच तु येवडा निर्दय असू शकतो
खरंच तु येवडा निर्दय असू शकतो


प्रश्न आहे माझा की, तु येवडा निर्दय असू शकतो का ?
चागल्या माणसांना तु घेऊन जातोस,
कसा रे तु येवढा निर्दय असू शकतो...
ज्याला तु घेऊन जातो त्याला माहित पण नसते की,
आपण जाणार, आणि तो तुझा सोबत येतो पण मुकाटयाने...
अधुरे काम सोडून तुझा सोबत त्याला जावे लागते...
वाटत नव्हतं मला की तु माणसांपेक्षा निर्दय असणार..
माणसे तर समोरून प्रत्यक्षात वार करतात,
पण तु न सांगता कधी पण घेऊन जातोस...
जर तुला घेऊन जायचे राहते, तर मग जन्माला का घालतोस, हा प्रश्न आहे माझा ?
मनुष्याच्या खूप इच्छा, आकांशा, स्वप्न...अधुरे सोडून तु त्याना घेवून जातोस...
असा कसा रे तु एवढा निर्दयी असू शकतोस...
प्रश्न आहे माझा ?
उत्तर जरी तु देत नसला तरी प्रश्न मि करणार...
कारण तु आहे किंवा नाही ते माहित नाही मला,
पण मानव जात या पुथ्वीवर आहे...
म्हणून मि प्रश्न करतो की तुला, की तु खरंच येवढा निर्दय आहेस का ?...