खरंच सांग
खरंच सांग
ती आता भेटत ही नाही
पहिल्या सारखं खेटतं ही नाही
वाटतंय जरासं ती विसरली आता
कारण तिचा खरा जीवनसाथी दुसराचं होता
पाहून मला का उलटे फिरले वारे
जाऊ दे सोड तू सारे
खरंच सांग मी तुला आवडत नव्हतो का रे
माझ्या सोबती सावल्या बाजुला झाल्या
जिथं तुझ्या माझ्या भेटी रोज झाल्या
अन ती ओसाड जागा ते एकटं पडलेलं फुल
आता तिथं बांधाव कसं प्रेमाचं घरकुल
तिथं खाक झाल्या आठवणी खाक झाले पत्र
उरले आता काळजावरचे चित्र
पडले डोळ्यासमोर प्रेमाचे रखरखते निखारे
जाऊ दे सोड तू सारे
खरंच सांग मी तुला आवडत नव्हतो का रे
कॉलेजात गेल्यावर ती जागा साफ नसते
शेजारी कोण नाही कवितेची वही असते
एक ओळी दोन ओळी कवितेची सुरवात होते
हवेची झुळूक बेंच वरची धूळ उडवते
नजर तिकडे जाते कविता फुल्लस्टॉप घेते
तू शेजारी असल्याचा भास होतो
काळजाला पुन्हा प्रेमाचा त्रास होतो
बघ तेव्हाच कसे उडतात आसवांचे फवारे
जाऊ दे सोड तू सारे
खरंच सांग मी तुला आवडत नव्हतो का रे
कॉलेजच्या कँटिंगमध्ये
एकाच कपात कॉफी प्यायचो
त्या निमित्तान एकरूप व्हायचो
तोच कप आज तुझी आठवण करून देतोय
तोच कप अजून साथ देतोय
फक्त त्यावेळी कॉफी
अन आज दोन ओळी लिहण्याची शाई
काय करावं सुचत नाही
म्हणून मीच काही बोलत नाही
खरंच कशासाठी केलेस तू इशारे
जाऊ दे सोड तू सारे
खरंच सांग मी तुला आवडत नव्हतो का रे
