खरंच सांग
खरंच सांग
ती आता भेटत ही नाही
पहिल्यासारखं खेटतही नाही
वाटतंय जरासं ती विसरली आता
कारण तिचा खरा जीवनसाथी दुसराच होता
पाहून मला का उलटे फिरले वारे
जाऊ दे सोड तू सारे
खरचं सांग मी तुला आवडत नव्हतो कारे
माझ्यासोबती सावल्या बाजुला झाल्या
जिथं तुझ्या माझ्या भेटी रोज झाल्या
अन ती ओसाड जागा ते एकटं पडलेलं फुल
आता तिथं बांधाव कसं प्रेमाचं घरकुल
तिथं खाक झाल्या आठवणी खाक झाले पत्र
उरले आता काळजावरचे चित्र
पडले डोळ्यासमोर प्रेमाचे रखरखते निखारे
जाऊ दे सोड तू सारे
खरंच सांग मी तुला आवडत नव्हतो का रे
कॉलेजात गेल्यावर ती जागा साफ नसते
शेजारी कोण नाही कवितेची वही असते
एक ओळी दोन ओळी कवितेची सुरवात होते
हवेची झुळूक बेंच वरची धूळ उडवते
नजर तिकडे जाते कविता फुल्ल stop घेते
तू शेजारी असल्याचा भास होतो
काळजाला पुन्हा प्रेमाचा त्रास होतो
बघ तेव्हाच कसे उडतात आसवांचे फवारे
जाऊ दे सोड तू सारे
खरंच सांग मी तुला आवडत नव्हतो का रे
कॉलेजच्या कँटीनमध्ये
एकाच कपात कॉफी प्यायचो
त्या निमित्तान एकरूप व्हायचो
तोच कप आज तुझी आठवण करून देतोय
तोच कप अजून साथ देतोय
फक्त त्यावेळी कॉफी
अन आज दोन ओळी लिहण्याची शाई
काय करावं सुचत नाही
म्हणून मीचं काही बोलतं नाही
खरचं कशासाठी केलेस तू इशारे
जाऊ दे सोड तू सारे
खरंच सांग मी तुला आवडत नव्हतो का रे
