खर प्रेम
खर प्रेम
ह्रदय पारदर्शी असते तर
तुला सहज बघता आले असते
चल जावू दे.....पण हो
मी माझ्या ह्रदयाचा कुपीततिच्या भावनांनी
कहर केला
आणि माझ्या ह्रुदयाला
माहीत नाही
मग मी ही तिच्याकडे बघण्याचा नुसताच बहाणा केला
आणि घुसलीच ना
तिच्या नजरांची कट्यार
माझ्या काळजात
मी ही घातला घाव
तिच्या जखमी ह्रदयावर
आणि हसली ना
खळी तिच्या गालावरची
तिच्या डोळ्यांवर आलेली केसांची बट करंगळीने
कानाच्या कडीत अडकवताना
तिचं ते लडिवाळपणे माझ्याकडे बघनं
मला जरा
अवघडल्यासारख वाटायचं
म्हणून मी नजरेआड व्हायचो पाहून तिला
पण शोधुन काढायच्या तिच्या नजरा
आणि बंद करून घ्यायच्या पापण्याआड मला
पण मला नाही बंद करता आले पापण्याआड
मी फक्त पहात होतो
माझ्याकडे हसता बघता
पुंन्हा पुंन्हा तिच्या नजरेआड येणारी केसांची बट मागे घेण्याचा तिचा तो खोडकरपणा
