खोटे रूप
खोटे रूप
1 min
152
मनातलं सांगायला मन मोठे हवे
ऐकणाऱ्याचे सुद्धा कान पक्के हवे
अशाच गप्पागोष्टी तर खूप होती
अर्थाचा अनर्थ बरेच जण काढती
निव्वळ त्यांचा स्वार्थ म्हणून जमती
काही वेळेस त्यांची फजिती बघती
तरी पण म्हणायला सगळे आपले
एकास काढून त्यात दुसऱ्यास झाकले
अशा लोकांची गट्टी आहे खूप
खोटे वागणे आणि खोटेच रूप