STORYMIRROR

Govardhan Bisen 'Gokul'

Others

4  

Govardhan Bisen 'Gokul'

Others

खेळ ऊन पावसाचा

खेळ ऊन पावसाचा

1 min
254

आली पावसाची सर

करी  अवनी  श्रृंगार |

शालू  हिरवा  नेसून

दिसे  सजलेली नार ||१||


दाट झाडीतून जातो

एक  रस्ता  सुनसान |

दिसे    वळणावरती

रांगा डोंगराच्या छान ||२||


रम्य   डोंगर   हिरवा

माथा  टेके  गगनाला |

खेळ ऊन पावसाचा

सांजवेळी सुरु झाला ||३||


रश्मी सुर्याची सोनेरी

शिरतसे     तुषारात |

घेती    इंद्रधनुष्याचे

रुप  मोहक  नभात ||४||


वाटे निसर्गाने जणू

गीरीरुपी   डोईवर |

सप्तरंगी   चंद्रहार

चढविला   भुईवर ||५||


'तानापिहि निपाजा' हे

रंग    इंद्रधनुष्याचे |

श्रावणात  वारंवार

मन मोहे मनुष्याचे ||६||


Rate this content
Log in