कौतुकाची थाप
कौतुकाची थाप
कौतुकाची थाप द्यायला
मन मोठं असावं लागतं
माणसातलं माणूसपण
त्यासाठी अंगी असावं लागतं...!!
दोन शब्द प्रेमाचे सदैव
प्रेरणाच देऊन जाते
कळत नकळत समोरच्यास
बळ देऊन जाते....!!
कौतुक करा अथवा न करा
समोर जाणारा समोरच जातो
कौतुक न करणारा मात्र
उगाच भाव खाऊन जातो....!!
खुल्या मनाने उघड मनाचे दार
प्रत्येक घटका देईल यशाची ललकार
संकुचित वृत्तीच एक दिवस
तुझा ठरेल घातकार...!!
जे पेराल ते उगवेल
संस्कृतीच आहे आपली
चांगल्यासोबत चांगलेच होते
हीच शिकवण आपली...!!
आदर्शाचा घेऊन वारसा
विचारांची उंची वाढवू
दोन शब्द कौतुकाचे बोलून
नका कोणास मध्ये अडवू....!!
रामबाण उपाय एकच यावर
मी सोडा आपोआप मोठे व्हाल
माणसाची माणुसकीच शेवटी
अंतसमयी सोबतीला न्याल....!!
रिकामा देह निघून जाईल प्राण
कौतुकाची थाप गड्या दे
तुला माणुसकीची आण
कौतुकाची थाप दे...!!
