STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

कौतुकाची थाप

कौतुकाची थाप

1 min
888

कधीतरी द्यावी । कौतुकाची थाप ।

उल्हास अमाप । मिळे जणू ।।


भरभरूनही । करावे कौतुक ।

कधी सहेतुक । पुढच्याला ।।


कौतुकाचे बोल । भिडे काळजाला ।

उर्जा माणसाला । मिळतेच ।।


कंजूस मनाचा । नुसतेच पाही ।

जळतच राही । वृत्ती त्याची ।।


कळेल का कधी । भाव हो मनाचे ।

शब्द अंतरीचे । असतात ।।


कविता कधीही । नसते कविता ।

असे आत्मियता । कवीचीच ।।


बोल ह्रदयीचे । घ्यावे जरा ध्यानी ।

नको मनमानी । स्वत:चीच ।।


शाब्दीक कौतुक । करावेत कधी ।

माणुसकी साधी । दाखवावी।।


जळणारे झाले । एकमेकांवरी ।।

लोकं नानापरी । कळतात ।।


सोडून द्या ना हो । तुझी हेकेखोरी ।

भरते तिजोरी । एकदाची ।।


मनातून द्यावी । कौतुकाची थाप ।

सुख आपोआप । मिळेल हो...।।


Rate this content
Log in