STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

काय भेटलं जाळून

काय भेटलं जाळून

1 min
299

उद्याची भावी पिढी घडवायला निघालेल्या 

अंकीताला काय भेटलं जाळून?

वासनांध नजरानी बरबलेल्या 

नराधमा बसला होता पाळत ठेवून...?


कशी तुला तुझी माय बहीण नाही दिसली

माणुसकीच्या नावालाच काळीमा फासली

काय म्हणला असेल बिचारीचा जीव

कळत नाही लोकांना कशी येत नाही कीव....?


निर्भया,प्रियंका,आसिफा, आणि ही अंकीता

कोणास ठाऊक अजून किती जाणार आहेत बळी

कसे विसरलेत संस्कार का विकली माणुसकी

किती कुस्करणार आहेत अजून कळी.....


अशा नराधमांना सांगा कोणती द्यावी शिक्षा

की द्याव त्यालाही भर रस्त्यात पेटवून

किती द्यायची निवेदनं किती काढायचे मोर्चे

का उगाच बसतं शासन डोळे मिटवून....


तुझ्या या असल्या अमानवी कृत्याचा 

बघं जाहिर निषेध आहे

निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशीच

होण्याकडे सा-यांचे वेध आहे.....!!



Rate this content
Log in