काव्यमय कोडे
काव्यमय कोडे
चयापचयाचे केंद्र ते
होई बिलिरूबिन घटक तयार
वाढले जर प्रमाण त्याचे
होतो काविळीचा असर.....!!
बनवतो महत्त्वाची प्रथिनं
कार्य असावे व्यवस्थित
कार्य जर बिघडले तर
होतो मानव सदा व्यथित....!!
संप्रेरकाचे ते उगमस्थान
त्याचावरच खरे अवलंबून असते
ड जीवनसत्त्व सक्रीय करण्या
खास भूमिका ते बजावते....!!
साठवतं बी १२ हे जीवनसत्त्व
तरच चांगल्या आरोग्याची हमी
कार्य त्याचे बिघडले तर
अॅल्ब्युमिनच्या प्रमाणाची कमी....!!
कळले का कोणते आंतरेंद्रिय?
असा आहे तो अनमोल कोण?
सांगा सांगा लवकर सांगा
उत्तर येत नसेल तर लावा फोन....!!
