काळजाच्या पायऱ्या
काळजाच्या पायऱ्या
काळजाच्या पायऱ्या
सर सरकत जातात
श्वासातुन अगणित
स्पंदने बाहेर पडतात
जेव्हा तुला कळतंच नाही
तुझ्या माझ्यातल्या
त्या अंतराची किंमत
प्रेम केल्यावर जशी
तू दाखवली नाहीस हिंमत
कारण तू कधी स्वीकारलं नाहीस मला
अन मी दिलेल्या प्रत्येक भेटीला
जेव्हा पावसाच्या सरींचे असंख्य काटे
काळजाच्या भावनांच्या जातात ना वाटे
पुन्हा दुःखाची चाहूल येते
अश्रू धारा वाहू लागतात
लपण्यासाठी जागा शोधावी लागते
कोणी पाहू नये म्हणून
कारण आणखीन वेड ठरवतील मला
कोण विचारणार कोण दोष देईल तुला
अगं तेच तर नकोय मला
याचं आपसूक दुःख होईल बस्स मनाला
पण राहूदे आता नकोय तुझा आधार
जगणं शिकलो आहे बघ मी उधार
एक करशील ना पुन्हा येऊ नकोस आता
तुझं स्वप्न अन तुझं हसू पहावंणार नाही
मन खूप हळवं आहे ना त्याची समजूत
मला कधीच काढता येणार नाही
ते आता खूप थकलंय वाट तुझी पाहून
अन रडलंय एकटं एकटं राहून
नको वाटतं आता बस्स मरण आलं ठीक
नाहीतर त्यासाठी देवापाशी मागेल भीक
