काही क्षण अंधारात गेले
काही क्षण अंधारात गेले
काही क्षण अंधारात गेले
पण त्या क्षणी किती दिवे लागले
त्या एका आवाजामुळे
सारेच एक झाले
ऐकीच्या बळातुन
सामर्थ्य मिळाले
धैर्याचा हात पाठीवर ठेवून
लाख हातानी दिव्य युद्ध
सुरू केले
त्या क्षणी किती दिवे लागले
जन देशाची चिंता होती
संकटाशी लढाई होती
काळजीत देश माझा
मरणाची पहाट होती
पाठीशी उभे राहुन
त्या द्रुष्टीला सारेच
शरण गेले
त्याच क्षणी किती दिवे लागले
झाले प्रहार कितीही तरी
देश झुकणार नाही
केला कितीही द्वेष तरी
हा देश हारणार नाही
निश्चयाचा ध्वज घेवून
घाव घेणार नाही
बळ आत्मविश्वासाचे मिळून
आशेचे किरण दिसु लागले
त्याच क्षणी किती दिवे लागले
किती घ्याव्यात वेदना
दिवस कठीण आहे
खुप झाला कोंडमारा
गाव गाव भयान आहे
हातात हात घेवून
तेजाकडून तिमिराकडे
पावले पडु लागले
त्याच क्षणी किती दिवे लागले
