जोतिबा तुम्ही होतात म्हणून
जोतिबा तुम्ही होतात म्हणून
गुलामगिरीच्या विळख्यात होता काळ
तुम्ही परिवर्तनाला केली सुरुवात
सामाजिक बदल घडवण्यासाठी
पेटविली स्त्री शिक्षणाची ज्योत
समाजात अज्ञान, अंधश्रद्धा भयंकर
त्यावर तुम्ही केले लेखणीने वार
पुढची पिढी सुशिक्षित होण्यासाठी
खुले केले अस्पृश्याला स्वःताचे घर
तुम्ही जाणिले स्त्रियाचे भविष्य
रोवली त्यांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ
बालहत्या, सतीप्रथा, केशवपन बंदी
काढली मनातील कायमची तेढ
बालविवाह भ्रुणहत्या विधवा संगोपण
जोतिबा ते खुप वाईट होता काळ
क्रांतीकारक चळवळ चालवुन तुम्ही
दत्तक घेतले एका विधवेचे बाळ
जातिव्यवस्थेवर प्रहार करुन तुम्ही
समाजात आत्मविश्वास निर्माण केला
समस्याची जाणीव करुन देऊन तुम्ही
सत्यशोधक समाज विकासाकडे नेला
धार्मिक कर्मकांडावर ओढले कोरडे
ईश्वर एकच आहे निर्गुण निराकार
बहुजनात रुजवले तुम्ही ज्ञानाचे बिज
प्रखडपणे मांडली भुमिका होई साकार
अज्ञानी,कर्जबाजारी, दरीद्री शेतकरी
तुम्ही मांडला घाट शेतक-याचा आसुड
उठवले वादळ जेव्हा तुम्ही परिवर्नाचे
तेव्हा समाज तुमचा घेत होता सुड
समाज बदण्यासाठी विद्येचे महत्व
सावित्रीला शिकुन प्रथेवर सोडले पाणी
बहुजनात देशाचे हित जाणिले तुम्ही
जोतिबा आमच्या ओठी तुमची गाणी
