जोड़ा वृक्ष शिव नाता
जोड़ा वृक्ष शिव नाता
पितो शंकर स्वतःच
सर्वांसाठी विष सारा |
वायू कार्बाम्ल तसाच
शोषे वृक्ष हा बिचारा ||१||
देतो शंकर अमृत
रक्षणास सुरजन |
तसा वृक्ष मनुष्याला
प्राणदायी ऑक्सिजन ||२||
वृक्ष तोडून मानव
करतोस अत्याचार |
याच्यामुळे वाढले रे
वायु मंडल विकार ||३||
नाही मिळे शुध्द हवा
होत आहेस बिमार |
फळ कर्माचे भोगतो
आता होऊनी लाचार ||४||
करा पुजन वृक्षांचे
देव समझुनी आता |
वृक्ष रोपण करूनी
जोड़ा वृक्ष शिव नाता ||५||
करा योग प्राणायाम
निसर्गाच्या छत्रछायी |
देतो वृक्ष मनुष्याला
शुध्द हवा प्राणदायी ||६||
