STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Others

4  

Sanjay Dhangawhal

Others

जिजाऊच्या लेकी

जिजाऊच्या लेकी

1 min
464

मावळे फक्त तेव्हाच होवून गेले शिवबाचे

आता ईथे तिथे कावळे आहेत

काळ्या नजरेचे बगळे आहेत

इतिहास घडवला तेव्हा

शिवबांच्या मवळ्यांनी

आणि रयेतेची ईभ्रत सांभाळली

आताच्या कावळ्यांनीतर

माणूसकीच बाटवली


दाढी वाढवून कोणीपण शिवाजी होत नसतो

गजर गर्जना करुन शिवभक्त म्हटला जात नसतो

शिवबाच्या राज्यात तर

लेकि सुना सुरक्षितच होत्या

झालाच अपराध कोणाकडून तर महाराजांची मावळ्याना चेतावणी होती

कडेलोट करण्याची सुनावणी होती


पण आता जग बदलले

म्हणून जगणे बदलले

जगणे बदलले म्हणून जागायचे अवघड झाले

कोणालाही एकटे कुठे जाता येत नाही

रक्षणाची हमी देता येत नाही

अरे नाते रक्ताचे नसले म्हणून छेडायचे नसते

माणूसकीच्या नजरेतून वागायचे असते

परके जरी असले तरी काय झाले

त्यांच्यातही अपली बहिण बेटी बघायची असतें


शिवबांचे मावळे आता येणार नाहीत

कोणाच्याही रक्षणाला

आपल्या रक्ता रक्तातच मावळे आणले पाहीजे

माणसांच्या गर्दीतील

प्रत्येक बहिण बेटी जपल्या पाहिजे

या जिजाऊंच्या लेकी सुना पुजल्या पाहिजे


Rate this content
Log in