STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Others

3  

Sanjay Dhangawhal

Others

जिभेचे चोचले

जिभेचे चोचले

1 min
339

कुठे काही चमचमीत

दिसले की

तोंडाला पाणी सुटतं

किती खावे किती नाही 

असं जिभेला खुप वाटतं


जिभेवर लाळ घेळताना

चोचले तिचे पुरवावेच लागतात

गरमागरम खाताना

 तोंड फुगवते

 

जीभ जळली की मग 

घटाघटा पाणी प्यायचं

हाश हूश करताना

डोळ्यातलं पाणी पुसायचं


मस्त मस्त खाण्यासाठी जीभ लई चभरं चभरं चालते

चटपटीत पाहून कशी ती गोडं गोडं बोलते


मनासारखं झाल की 

जिभेची मजाच असते

नविन नविन चव चाखून

लालबुंद दिसते


खाऊन झाल्यावर

थंडगार पेय पिऊन 

जीभ तिचा जळकेपणा 

 शांत करते

मोठ्या फुशारकीने 

मगं ती होठावरून फिरते


तिला जर नाही दिले

 तर मग ति घसरल्यावर कोणाच ऐकत नाही

तिचे लाड पुरवल्याशिवाय

ती स्वस्थ बसत नाही


Rate this content
Log in