STORYMIRROR

Govardhan Bisen 'Gokul'

Others

3  

Govardhan Bisen 'Gokul'

Others

जाईन पंढरी

जाईन पंढरी

1 min
235

तुझे करु ध्यान 

विठ्ठल माऊली । 

आहे माझ्यासाठी

कृपेची सावली ।।१।। 


पुंडलिक करे

मायबाप सेवा ।

दारी वाट पाही

कानोबा तो देवा ।।२।।


तेव्हा पासूनच 

उभा विटेवरी ।

ठेऊनिया हरी

कर कटेवरी ।।३।।


विटेवरी उभा 

म्हणूनी कानोबा ।

जगात नावाने

झाला रे विठोबा ।।४।।


आषाढ़ीला होई

पंढरीची वारी ।

एकादशी दिनी

गोळा वारकरी  ।।५।।


भेटीचा उमंग 

भक्तिचा तरंग । 

आनंदाने होती

वारकरी दंग ।।६।।


जाईन पंढरी 

आतुर लोचन ।

मनी माऊलीचे

करीन दर्शन ।।७।।


म्हणे गोवर्धन 

ठेव तु छायात ।

मला पांडुरंगा

आपल्या मायात ।।८।।


Rate this content
Log in