STORYMIRROR

vaishali vartak

Others

4  

vaishali vartak

Others

जागी हो रणचंडिके

जागी हो रणचंडिके

1 min
352

वेळआली नारीशक्ती जागृतीची

सज्ज हो तू प्रतिकाराला

नव्हती कधीच तू अबला

आठव तुझ्यातील नारी शक्तीला


फोड वाचा अन्यायाला 

अधमांना दे कर्माचे फळ

होऊनी रण चंडिका तुची

दाखव तयांना मनगटाचे बळ


आठव काळ, मर्दानी लक्ष्मीबाईंचा

शौर्य, धैर्य अन् पराक्रमाचा

घेऊनी हाती, कर वार शस्त्राने

राक्षसी दानवी त्या क्रूर कर्माचा


मात करण्या संकटावरी

स्व-रक्षणाचे घे तू धडे    

नराधमांचा अंत करण्या

तुझे बळ कधी कमी न पडे


जाण्या सामोरे नराधमांच्या

धैर्याचे ठेव सदा हत्यार

नकोच ती, कधी म्यानात

आत्मविश्वासाची तळपती तलवार


आदी काळातील तुझीच रुपे

 आठव दुर्गा, काली, अंबिके

करण्या दृष्टांचा संहार 

जागी हो, तू रणचंडिके


साहित्याला गुण द्या
लॉग इन