इवल्याशा मनात
इवल्याशा मनात
त्या इवल्याशा मनात
साठवून तरी किती
साठवायचं
साठवण्याधी त्या मनाला
एकदातरी विचारून बघायचं
मन काहीत बोलत नाही
म्हणून साठवतच राहतो
काहीच कामच नसत साठवलेलं ते
तरी मन जपून ठेवतो
साठवून साठवून
मन जड होतं
रिकाम कधी होत नाही
आपलच गाऱ्हाण
मनाला सांगतो
पण त्या मनाच गाऱ्हाण
कोणी एकत नाही
काय होत असेल त्या मनाची तगमग
त्या मनालाच माहीत
त्या मनाला होणाऱ्या वेदना
मात्र कोणी समजून घेत नाहीत
रोज कितीतरी घाव असतात मनावर
मन मुकाट्याने सहन करून घेत
अश्रुंचा बांध फुटल्यावर
मन बिचारं आतल्या अत रडून घेतं
किती त्रास द्यायचा
त्या मनाला
कधीतरी त्या मनाचही ऐकले पाहिजे
मन सांगेल तस वागंल पाहिजे
मन तर रोज जखमी होतं
पण कठोर होत नाही
काही जरी झाल तरी ते
कोणापासूनही वेगळ
ऱ्हात नाही
