इदं न मम्
इदं न मम्
किती त्या दिधल्या आहुत्या
"इदं न मम्" म्हणोनि
यज्ञच झाला आयुष्य म्हणविता
सोडिले साऱ्यावर पाणी
तोंडओळख नसता आयुष्याची
उसळलेल्या झळा इवल्या उदरी
दिली आहुती ती पहिली
लेऊनी काळी राख भरजरी पदरी
दिसतो नेत्रांसी साथीला
पण हाती न येणारा 'धूर'
ओलावली आहुत्यांत जरी नेत्रे
कोंडलेला तो मुका मुकाच सूर
असीमित परंतु बंदिस्त
भडकविलेल्या अदृश्य ज्वाला
पिऊन शांत होती मग
तो विषाचा राखलेला एकच प्याला
स्वाहा केले यज्ञात
स्मितवक्र ओठी राखीत
सोडिले साऱ्यावर कोरडे पाणी
इदं न मम् चे पारायण करीत...