Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anil chandewar

Others

3  

Anil chandewar

Others

हरे राम !

हरे राम !

1 min
38

राष्ट्रपिता बापू जगी महान

देशासाठी वाहिले जीवनदान

जीवन चरित्र घ्यावे ऐकून

जय जय भारत भूमी ||

२ ऑक्टोंबर ६९ सालात

पुत्र जन्मले गुजरात राज्यात

पोरबंदर या खेडेगावात

जय जय भारत भूमी ||

पित्याचे नाव करमचंद

नाव ठेविला मोहनदास

आनंद झाला सर्व जनास

जय जय भारत भूमी ||

वकिलीचा धंदा सोडून दिला

गावागावात चरखा चालविला

खादीचा मंत्र देशाला दिला

जय जय भारत भूमी ||

चंदनापरी देह झिजवला

जिद्द पकडुनी स्वतंत्र मिळविला

भारत देश सुखी हो झाला

जय जय भारत भूमी ||

जानेवारीच्या ३० तारखेला

नथूने गोळी झाडली बापूला

‘हरे राम’ म्हणुनी प्राण सोडला

जय जय भारत भूमी ||

Rate this content
Log in