हृदयाची हाक
हृदयाची हाक

1 min

355
सांग सखे अशी घालतेस घिरट्या
मनातले तुझ्या कळते आता मला
नको होऊस अस्वस्थ अशी
हृदयाची हाक तुझ्या ऐकू येते मला
केविलवाणा चेहरा पाहता मन दुखावते
तुझ्या मनातली सल हळूच डोकावते
लपवून ठेवलेस ओझे हृदयावरती
मोकळा श्वास घे दिवस हे ही सरती
आनंद ओजंळीत साठवताना
कितीदा पाहीले मी सखे तूला
आता का घेतलीस विरक्ती
स्वप्न बघणे आवडेना तूला
तुझे लोभसवाणे दिसणे
उभारी देते आम्हाला
तुझे शब्द दाखवती
विश्वासाचे जगणे आम्हाला