STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

होळी कुविचारांची

होळी कुविचारांची

1 min
215

त्या कुविचारांची । चला करू होळी ।

अवगुण जाळी । होळीदिनी ।।


वाईट सवयी । जाळून हो टाका ।

नाही असा मौका । पुन्हा कधी ।।


घातक त्या रूढी । गाढून टाकूया ।

चांगले वागुया । सर्वाप्रती ।।


नको उणीदुणी । नका ठेवू गर्व ।

जाळून हो सर्व । टाकू चला ।।


लावा रे बाळांनो । नैसर्गिक रंग ।

एकमकासंग । मैत्रीभाव ।।


विघातक रंग । वापरू रे नका ।

होईल हो धोका । आरोग्याला ।।


खेळायचा रंग । पळसफुलाचा ।

आणि हळदीचा । वापरूया ।।


त्या कुविचारांची । करू चला होळी ।

व्यसन हो टाळी । प्रण करू ।


कष्टाचेच खावू । प्रेमाने राहूया ।

आनंदी राहुया । सा-यांनीही ।।


Rate this content
Log in