हिरव्या हिरव्या पानांवर
हिरव्या हिरव्या पानांवर
1 min
274
हिरव्या हिरव्या पानांवर
थेबंं दवांंचा बसला होता
गंध फुलांंचा दरवळतांना
चेहरा तिचा हसला होता
घेतल्या कवेत कळ्या साऱ्या
भ्रमर तिच्यावर रूसला होता
तिच्या नाजूक साजूूूक बोटांंनी
मोगरा अलवार फुलला होता
अशाच एका सुवर्णसकाळी
डाव काट्यांंचा फसला होता
माळ फुलांची ओवताना
गजरा तिच्या वेेेणीवर सजला होता
